
देवगड : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत तळवडे महसूल मंडळात, 14 मार्च रोजी सकाळी ०९.०० एक दिवसीय समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरात महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध लाभांच्या योजना लाभार्थ्यांना थेट देण्याकरीता देवगड तालुक्यातील शासनाच्या विविध कार्यालये सहभागी होणार आहे.
शिरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात अभियान संजय गांधी योजना फॉर्म स्वीकारणे, वितरण करणे, माहिती देणे सेतु विभागाच्या सुविधा, महाई सेवा केंद्र मार्फतचे दाखले, पुरवठा शाखा विषयक कामकाज करणे निवडणूक ओळखपत्र अॅग्रीस्टॅक आधार कार्ड पंचायत समिती संबंधीत योजना कृषि विभाग संबंधीत योजना. कृषि विभाग, पंचायत समिती देवगड भूमि अभिलेख कार्यालयाशी संबंधीत कामकाज भूमिअभिलेख,आरोग्य विभाग मार्फत आरोग्य विषयक सुविधा अशा अनेक सुविधांचा लाभ दिला जाणार आहे. तरी नागरीकांना या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन देवगड तहसिलदार रमेश पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.











