देवगडात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे निधी वितरण

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 14, 2026 14:05 PM
views 46  views

देवगड : देवगड तहसीलदार कार्यालय येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) 22 वा हप्ता वितरण ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.सदर कार्यक्रमासाठी गणेश राणे (सभापती ) पंचायत समिती देवगड, अमोल लोके (उपसभापती ) पं.स. देवगड,. अजितराव गोगटे (माजी आमदार),विवेक शेठ (निवासी नायब तहसीलदार ) देवगड, श्रीम.आरती पाटील (तालुका कृषी अधिकारी )देवगड, श्रीम. मानसी पवार (कृषी अधिकारी) देवगड शेतकरी उपस्थित होते.

उपस्थितांचे सत्कार झालेनंतर आरती पाटील यांनी प्रास्ताविकात PM-KISAN योजनेचे सविस्तर स्वरूप सांगितले तसेच काही शेतकरी वंचित असतील त्यांनी ऑनलाईन अर्ज करून लाभ घेण्याचे आवाहन केले.. गणेश राणे (सभापती ) जास्तीत जास्त शेतकरी यांनी PM-KISAN योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले व कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कृषी विभागचे यावेळी आभार मानण्यात आले.