कलमठ ग्रामपंचायतीतर्फे महिला दिन उत्साहात

विधवा प्रथा विरोधी योजना सर्वानुमते संमत
Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 14, 2026 14:02 PM
views 41  views

कणकवली : कलमठ ग्रामपंचायतीतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून कलमठ ग्रामपंचायत तर्फे महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. महिला ग्रामसभेला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी कलमठ ग्रामपंचायतीने घेतलेल्या विधवा प्रथा विरोधी भूमिकेला उपस्थित महिलांनी हात उंचावून पाठिंबा सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला. 


विशेष म्हणजे सरपंच संदीप मेस्त्री यांनी या महिला ग्रामसभेच्या अध्यक्षपदाचा मान गेली अनेक वर्षे ग्रामसभेला कायम उपस्थित असणाऱ्या ८७ वर्षाच्या सुमती चिंदरकर यांना दिला. यावेळी, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौ. सुप्रिया संदीप मेस्त्री यांनी दिली


यावेळी पाककला स्पर्धा ही पार पडल्या. यामध्ये नंदिनी मतल यांनी प्रथम, रश्मी मठकर यांनी द्वितीय, चैत्राली कांबळी यांनी तृतीय तर‌ शिवन्या पोयेकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला.‌ सर्वांना भेट शवस्तू देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण शगौरव मुंज यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन तनिष्का लोकरे यांनी केले.


यावेळी उपस्थित महिलांच्या वतीने यावेळी नवनिर्वाचित जिल्हापरिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, सदस्या स्वाती नारकर, तनिष्का लोकरे, इफत शेख, प्रियाली आचरेकर, हेलन कांबळे, माजी उपसरपंच विनिता बुचडे, माधवी काकडे, सीआरपी अभिलाषा शिंदे, समीक्षा नांदगावकर, सुनीता लाड, अनिता साळगावकर, मुख्याध्यापक मधुरा सावंत, निधी करंजकर, सुप्रिया पाटील, समीक्षा चिंदरकर, स्वच्छता मिशनच्या नम्रता  कुडाळकर, उमेद अधिकारी श्री. परब, अंकिता राणे , ज्योती आमडोसकर, अण्णा सावंत, खुशाल कोरगावकर, गणेश सावंत, रमेश चव्हाण आदी उपस्थित होते .