
सावंतवाडी : ६ डिसेंबर हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. आज यानिमित्त शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील कार्यालयात बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष गुंडू जाधव, मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष सिताराम गावडे यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
यावेळी गुंडू जाधव यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या व बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा दिला, 1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरात डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे निधन झालं होतं, त्यामुळेच या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असे म्हटले जाते व तो दिवस बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणीने साजरा केला जातो. यावेळी गजानन नाटेकर विश्वास घाग ,श्री बांदेकर ,श्री भोगणे, व कार्यकर्ते उपस्थित होते.