गावकऱ्यांच्या श्रमदानाने तयार केला महाळूंगे - देवळेकरवाडी गणेश विसर्जन घाट..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 28, 2023 13:14 PM
views 412  views

देवगड : देवगड  महाळूंगे  गावातील देवळेकरवाडी येथे देवळेकर,नवले,तोरसकर, आयीर,परब, पाळेकर अशी जवळपास १५० कुटुंबीय राहतात हे दरवर्षी गणेश उत्सव उत्साहात साजरा करतात परंतु बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी यांना विसर्जन घाट व पाण्यात उतरण्यासाठी रस्त्ता नव्हता, याबाबत ग्रामपंचायत मधून यावर्षी काही निधी उपलब्ध होऊ शकणार नाही.असे समजल्यावर सरपंच संदीप देवळेकर,सदस्य सुभाष नवले,साक्षी तोरसकर व श्रावणी देवळेकर यांनी पुढाकार घेवून सर्व वाडीतील ग्रामस्थांना प्रोत्साहन देवून आपण श्रमदान करून हा घाट बांधूया अनेक मदतीचे हात पुढे येतील असे आवाहन केले.

खरोखरच पाच दिवस दररोज ६०/६५ लोकांनी एकत्र येवून हे आवाहन पूर्ण केले. यावर्षी ३०गणपतींचे विसर्जन पांच दिवसांनी या घाटावरूनच करण्यात आले. विसर्जन नंतर अनेकांनी या घाट निर्माण बद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला,नेहमीच शासनावर अवलंबून न राहता संघटित शक्ती अनेक कामे लीलया पारपाडू शकतात, याचे हे उदाहरण आहे,