कोकणात नवा विक्रम करणार महाचॅनेलची ग्लोबल स्पर्धा...मोस्ट व्हायरल बाप्पा

फक्त 100 रुपये नोंदणी फी ; लाखोंची बक्षिसे जिंकण्याची सोनेरी संधी
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: September 03, 2022 11:13 AM
views 183  views

सिंधुदुर्ग : गणेश स्पर्धा म्हटले की साधारणपणे ज्याची मुर्ती आखीव रेखीव, ज्याची सजावट चांगली आणि काही देखावा असेल तर त्यातुन मिळणारा संदेश यावर नेहमीच यश अवलंबुन असतं. अर्थात सर्व गणेशभक्तांच्या मनामध्ये भक्तीभाव असतो, परंतु प्रत्येकालाच अशी सजावट जमते, असं नाही. मग अशा गणेशभक्तांनी स्पर्धेत सहभाग घ्यायचा नाही का? गेली काही वर्षे सातत्यानं स्पर्धा घेतल्यानंतर हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. त्यामुळं सर्व कोकणवासियांना गणेश स्पर्धेत सहभागी होण्याबरोबरच लाखो रूपयांची बक्षीसेही उपलब्ध करून देण्यासाठी यावर्षी प्रथमच कोकणचे नंबर 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE नं ग्लोबल गणेश स्पर्धा आयोजित केली आहे, ती म्हणजे 'मोस्ट व्हायरल बाप्पा'.


स्पर्धा अगदी साधी आणि सोपी आहे, परंतु आपल्या घरातल्या बाप्पाला जगाच्या कानाकोप-यात पोहोचवणारी आहे, आणि तीही अगदी नाममात्र मोबदल्यात म्हणजेच फक्त 100 रूपयात. महाचॅनेलच्या 'कोकण फेस्टीवल' या फेसबुक पेजला आपण भेट द्यायची आहे. तीथं स्पर्धेच्या वेबसाईटची लिंक असेल. त्यावर क्लिक करून नोंदणी फि जमा करायची आहे. फि जमा झाल्यावर स्पर्धेचे पेज ओपन होईल. त्यावर आपल्या बाप्पांचा 2 मिनिटांचा व्हीडीओ अपलोड करायचा आहे. त्यानंतर त्यांची फायनल लिंक आपल्याला व्हाटसअप्पवर मिळेल. ती जास्तीजास्त व्हायरल करायची आहे. ज्यांच्या बाप्पाला सर्वाधिक व्युव्हर्स मिळणार, त्यांचे बाप्पा ठरणार लाखोंच्या बक्षीसांचे मानकरी, अगदी मानाच्या ट्रॉफीसह.


या स्पर्धेसाठी कोकणातील सर्वाधिक बक्षिसांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. यात पहिले बक्षीस 11,111 रूपये, दुसरे बक्षीस 9,999 रूपये आणि तिसरे बक्षीस 7,777 रूपये तसेच सन्मानचिन्ह असे आहे. त्याचबरोबर 1,111 रूपयांची दहा उत्तेजनार्थ रोख बक्षीसंदेखील आहेत.


आपल्या बाप्पांचा व्हीडीओ तयार करताना काही बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपल्या मोबाईलवर आपल्या बाप्पांचे शुट करा. शुट करताना मोबाईल आडवा धरा. सेटींगमध्ये जावून व्हीडीओ 750 P या प्रकारात शुट करा. या व्हीडीओला नंतर गाणे लावणे शक्य नसेल तर शुट करतानाच बाजुला गाणे सुरू ठेवून शुट करा. हा दोन मिनिटांचा व्हीडीओ अपलोड करा.


अत्यंत साध्या आणि सोप्या पध्दतीने ग्लोबल गणेश स्पर्धेत वाडी-वस्तीवरच्या सर्वच गणेश भक्तांना या स्पर्धेत सहभागी होवून लाखोंची बक्षीसं जिंकण्याची संधी मिळावी, यासाठी आमच्या टीमनं अत्यंत कौशल्यानं या ग्लोबल स्पर्धेचं आयोजन केलंय. कोकणातल्या गावागावातले गणपती जगाच्या कानाकोप-यात या स्पर्धेच्या माध्यमातुन झळकणार आहेत. त्यामुळं कोकणातल्या या लोकोत्सवाचं 'न भुतो न भविष्यती' असं ग्लोबल दर्शन दाखवण्याची ही सोनेरी संधी श्री गणरायाच्या आशिर्वादानं आपणा सर्वांना मिळाली आहे. या संधीचा लाभ आपण जरूर घ्यावा, असं आवाहन महाचॅनेलच्यावतीनं करण्यात आलंय.