३ सप्टेंबरला सावंतवाडीत महाआरोग्य शिबिराचं आयोजन..!

Edited by: विनायक गावस
Published on: August 28, 2023 10:50 AM
views 298  views

सावंतवाडी : सावंतवाडी माठेवाडा आत्मेश्वर मंदिर पाठीमागे श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स स्नेहदीप हॉटेल शेजारी रविवार 3 सप्टेंबर रोजी 2023 महाआरोग्य शिबिराच आयोजन जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान तसेच कोल्हापूर अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आल आहे. हे मोफत महाआरोग्य शिबिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी आयोजित केले असून महाआरोग्य शिबिराचा लाभ रुग्णांनी घेण्यात यावा असं आवाहन जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केले आहे.


त्यासाठी पिवळे केसरी अंत्योदय व अन्नपूर्णा रेशनिंग कार्ड तसेच आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असणे आवश्यक आहे. येताना सर्व प्रकारचे आरोग्य तपासणी रिपोर्ट तपासणीच्या वेळी घेऊन येण्यात यावे, सकाळी 12 ते 04 वाजेपर्यंत हे महाआरोग्य शिबिर होणार आहे. तपासणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रुग्णांना मोफत बस सेवा शस्त्रक्रिया करण्यासाठी सावंतवाडी ते कोल्हापूर येथे आयोजीत करण्यात आले आहे रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया औषधे व जेवण याचा सुध्दा मोफत लाभ रुग्णांना मिळणार आहे.


याचा लाभ सिंधुदुर्गवासीयांनी व सावंतवाडी तालुक्यातील रुग्णांनी मोफत लाभ घ्यावा, नोंदणीसाठी संपर्क ९४२२४३५७६० साधावा अस आवाहन राजु मसुरकर यांनी केले आहे.