'ते' पाप महाविकास आघाडीच !

वैभववाडी भाजपाकडून महाविकास आघाडीचा निषेध
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 21, 2023 16:10 PM
views 323  views

वैभववाडी : राज्यात सरकारी कर्मचारी भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडीने घेतला होता. खोट बोलून तो निर्णय महायुती सरकारचा असल्याचा भासवत आहेत. त्यातून युवकांची दिशाभूल करीत आहे.या आघाडी सरकाचा आम्ही निषेध करतो असं निवेदनाद्वारे मागील सरकारवर वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी टीका केली आहे.

कंत्राटी सरकारी नोकर भरतीवरून राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी महायुती सरकारला जबाबदार ठरवत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे .मात्र शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय महाविकास आघाडीनेच घेतला असल्याचे सांगत त्याबाबतचे पुरावे दिले. यानंतर राज्यभर आघाडी सरकारविरोधात भाजपने आज आंदोलन पुकारले आहे. तत्कालीन सरकारचा निषेध करण्यात येत आहे. वैभववाडी भाजपाच्या वतीनेही निषेध करण्यात आला. आघाडी सरकारने तो निर्णय घेतला होता. मात्र आता खोटे बोलून महायुती सरकारला जबाबदार ठरवत आहेत. या विषयांवरून युवकांची दिशाभूल करून राज्यातील वातावरण सरकार विरोधात करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. कंत्राटी भरतीचा जो निर्णय आघाडी सरकारने घेतला होता तो आताच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी रद्द केला असं काझी यांनी निवेदनात म्हटले आहे.