निलेश राणे पुरस्कृत कुडाळमध्ये रंगणार भव्य मंगळागौर स्पर्धा

Edited by:
Published on: September 07, 2023 14:42 PM
views 51  views

कुडाळ : भाजप नेते निलेश राणे पुरस्कृत भव्य मंगळागौर स्पर्धा रविवार, दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता भाजप कार्यालय कुडाळ समोरील पटांगण येथे रंगणार आहे. या मंगळागौर महोत्सवाचे उद्घाटन नीलम राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हे प्रमुख पाहुणे उपस्थित असतील. तसेच भाजप जेष्ठ पदाधिकारी दत्ता सामंत, भाजप उपाध्यक्ष रणजीत देसाई, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

मंगळागौर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक २१ हजार रु. आणि चषक, द्वितीय क्रमांक १५ हजार रु. आणि चषक, तृतीय क्रमांक १० हजार रुपये आणि चषक, तसेच उत्तेजनार्थ दोन संघांना प्रत्येकी ३ हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उर्वरित संघांना मानधन आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. यावेळी लकी ड्रॉ, प्रश्नमंजुषा कार्यक्रम सुद्धा होणार आहेत. या मंगळागौर स्पर्धेसाठी कुडाळ-मालवण मतदारसंघातून ९ संघ निवड करण्यात आले आहेत.

यामध्ये सखी फुगडी संघ पावशी, भैरव-जोगेश्वरी संघ कुडाळ, एकता महिला संघ तेंडोली, नवदुर्गा महिला संघ कुडाळ, धनलक्ष्मी आकेरी संघ, सिद्धी गणपती कवीलकट्टे, कुडाळेश्वर महिला संघ कुडाळ आणि भीमगर्जना संघ पाट यांचा समावेश आहे, अशी माहिती संध्या तेरसे यांनी दिली. या पत्रकार परिषदेवेळी भाजप कुडाळ तालुका अध्यक्षा आरती पाटील, पिंगुळी शहर अध्यक्षा साधना माडये, जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अदिती सावंत, कुडाळ शहर सरचिटणीस अक्षता कुडाळकर, शहर उपाध्यक्षा विशाखा कुलकर्णी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साक्षी सावंत आणि कार्यक्रमप्रमुख प्रज्ञा राणे आदी उपस्थित होत्या.