
वेंगुर्ला : श्री क्षेत्र रेडी द्विभुज गणपती मंदिरात माघी गणेश जयंती विनायक चतुर्थी उत्सव सोहळा साजरा होतोय. यानिमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. सकाळपासून मंदिरात या उत्सवाला सुरुवात होणार आहे.
सकाळी 6 वा. गणेश मूर्तींवर अभिषेक, सकाळी 8. 30 वा. सत्यविनायक महापूजा, दुपारी 12. 30 वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी 1 वा. महाप्रसाद, संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत स्थानिक भजने असे कार्यक्रम होणार आहे. तर महाप्रसादाच आयोजन श्री अजय सिंग देसाई, आणि मित्रपरिवार कोल्हापूरच्यावतीने करण्यात येणार आहे.
या उत्सवाला उपस्थित राहाण्याचं आवाहन श्री देव गजानन देवस्थान ट्रस्ट रेडीच्यावतीने करण्यात आलंय.