गणेश जन्मोत्सवाचा उत्साह !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 13, 2024 08:09 AM
views 117  views

सावंतवाडी : माघी गणेश जयंती निमित्त सावंतवाडीत ठिकठिकाणी मोठा उत्साह पहायला मिळाला‌. गणेश मंदिरात भाविकांच्या उपस्थितीत गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरासह तालुक्यात भक्तिमय वातावरणात पहायला मिळाले‌.


सावंतवाडी येथील श्री देव दैवज्ञ गणपती मंदिरात गणपती मूर्ती प्राणप्रतिष्ठा ३४ वा वाढदिवस तसेच  नारायण स्वामी पुण्यतिथी व बालाजी उत्सव साजरे करण्यात आले. मंगळवारी जन्मोत्सवा निमित्त पूजाअर्चा, अभिषेक, गणेश जन्मावर कीर्तन व गणेशजन्म सोहळा पार पडला. गणेश नामजप भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलं होतं.

तर सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणावरील श्री गणपती मंदिरात सालाबादप्रमाणे यावर्षी श्री गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येने भाविक यानिमित्ताने उपस्थित होते. दर्शन, महाप्रसादाचा त्यांनी लाभ घेतला. गणेश जयंती नंतर आरती व भजन पार पडलं. महाप्रसाद वाटपाची जबाबदारी सालाबादप्रमाणे आजी-माजी नगरसेवकांनी स्वीकारली होती. 

याप्रसंगी मुख्याधिकारी सागर साळुंखे, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, पाणी पुरवठा अभियंता भाऊ भिसे, रघु कोरगावकर, प्रतिक कोरगावकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, अफरोज राजगुरू, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, सत्यजित धारणकर, अनिल चिटणीस, सावंतवाडी नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवक, नगरपरिषद कर्मचारी वृंद,कुणकेरी येथील ग्रामस्थांसह गणेशभक्त या सोहळ्यास उपस्थित होते.