
सावंतवाडी : माडखोल माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून या परीक्षेला बसलेले सर्व ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात विशेष श्रेणीत ९ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत २८ तर द्वितीय श्रेणीत ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या प्रशालेतून प्रथम क्रमांक यशवंत निलेश कोठावळे (९१.४०% ४५७ गुण), द्वितीय क्रमांक नताशा नामदेव गवळी (८६% ४३० गुण) तर तृतीय क्रमांक रेश्मा रवींद्र येडगे (८१.२०% ४०६ गुण) या विद्यार्थिनींनी पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री सद्गुरू साटम महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप शिरसाट, उपाध्यक्ष कृष्णा राऊळ, सचिव बाबू परब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक रामप्रसाद गोसावी, शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.