
सावंतवाडी : माडखोल धरणाच्या सिंचनाची हंगामपूर्व बैठक एक महिन्यापूर्वी झाली. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे कमी पाण्यावर येणारी पिके घेण्याचे ठरले असून, धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याची साफसफाई न करता मागील दोन दिवसापासून टेस्टिंग साठी पाणी सोडल्याचा आरोप होतोय.
मागील ६ वर्पाषांसून दोन्ही कालव्यांवर सुमारे दीड कोटी पेक्षा जास्त निधी खर्च होऊनही, बऱ्याच ठिकाणी कालवा लिकेज होऊन पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत न पोहचता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नदी पात्रात जाऊन धरणातील पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप माडखोलचे सामाजिक कार्यकर्ते राजकुमार राऊळ यांनी केला आहे.
मागील दोन दिवस टेस्टिंगसाठी पाणी सोडल्यापासून पाटबंधारे विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी पाहणीसाठी उपस्थित नसल्याचे दिसून येते. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत प्रशासन पाण्याबाबत निद्रिस्त असून तात्काळ दाखल घेऊन पाण्याचा अपव्यव थांबवावा तसेच माडखोल वासियांनवर पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये अशी मागणी राजकुमार राऊळ व ग्रामस्थांकडून होत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








