कुडाळातील मच्छिद्र कांबळी नाट्यगृह लवकरच पूर्णत्वास जाणार

शासकीय मान्यता ; निलेश राणेंचा पाठपुरावा
Edited by: विनायक गावस
Published on: December 07, 2023 19:50 PM
views 129  views

कुडाळ : महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने कुडाळ येथे सुरू असलेल्या मच्छिद्र कांबळी नाट्यगृहाच काम गेली अनेक वर्षे रखडलेल्या स्थितीत होत. कुडाळ येथील नाट्यप्रेमी जनतेने या बाबत भाजपा नेते निलेश राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर निलेश राणे यांनी पाठपुरावा करत संस्कृतीत कार्य विभाग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत कुडाळ येथील मच्छिद्र कांबळी नाट्यगृहाच रखडलेल काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी अधिकच्या निधी वितरणाची मंजुरी देण्याबाबत चर्चा केली होती.

त्या नुसार महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून मच्छिद्र कांबळी नाट्यगृहाच्या कामासाठी १७ लक्ष १० हजार एवढा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्या नुसार लवकरच कामकाज सुरू होणार असून गेली अनेक वर्षे नाट्यप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मच्छीन्द्र कांबळी नाट्यगृह पूर्णत्वास जाणार आहे.