
चिपळूण : मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सी ए वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालय अलोरे मधील इयत्ता आठवी आणि पाचवी विद्यार्थ्यांनी, शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले आहे.
गुणवत्ता यादीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी- इयत्ता - ८ वी
१) कु. सोहम प्रशांत मोंडे ( ग्रामीण सर्वसाधारण यादीत व तालुक्यात ४ था )
२) कु. आयुष अजित तोरणे (ग्रामीण सर्वसाधारण यादीत व तालुक्यात ६ वा )
३) कु. स्वरा स्वप्निल सावर्डेकर ( SC प्रवर्गातून ग्रामीण सर्वसाधारण यादीत व तालुक्यात प्रथम) आणि
इयत्ता - ५ वी-
१) कु. स्वराज कृष्णदेव कदम ( ग्रामीण सर्वसाधारण यादीत व तालुक्यात २ रा)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेचे स्कूल कमिटी चेअरमन पराग भावे, विवेक संसारे मुख्याध्यापक श्री. सोळूंके, पर्यवेक्षिका श्रीमती गमरे, शिक्षक प्रतिनिधी सौ. मानकर, शिक्षकेत्तर प्रतिनिधी श्री. चिपळूणकर यांनी कौतुक केले.