गोव्यातील 'त्या' तरुणीचा मृतदेह आंबोलीत सापडला

Edited by:
Published on: September 01, 2023 18:44 PM
views 385  views

सावंतवाडी : प्रेयसीने पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून म्हापसा येथील एका युवतीचा प्रियकराने खून करून तिचा मृतदेह आंबोली घाटात फेकल्याचा प्रकार गोवा पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा व सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक आंबोली घाटात पोचले असून त्यांना तो मृतदेह सापडला आहे. तो बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे प्रकरण ३० ऑगस्टला पर्वरी येथे घडले होते. प्रकाश चुंचवाड (वय २२) असे संशयिताचे नाव आहे.

त्यांने आपली प्रेयसी कामाक्षी शंकर उडापनो (२१) हीचा आपल्या पर्वरी येथील फ्लॅटवर खून केला होता. तो मृतदेह गाडीतून आणून आंबोली घाटात फेकला होता. दरम्यान आपली बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या भावाने ३० ऑगस्टला म्हापसा पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार पुढील तपास म्हापसा पोलिसांनी केला. यात ताब्यात घेण्यात आलेल्या प्रकाश याने आपण संबंधित युवतीचा खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन आज गोवा पोलिसांचे पथक आंबोली येथे दाखल झाले. त्यानंतर घाटात शोध मोहीम राबवल्यानंतर खोल दरीत तिचा मृत्यू आढळून आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे.