घरावर वीज पडून एक लाख वीस हजाराचे नुकसान

शिरगाव-अभयनगर येथील एकनाथ चौकेकर यांच्या कुटुंबावर संकट
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 16, 2022 20:58 PM
views 187  views

देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव अभय नगर येथील एकनाथ चौकेकर यांच्या घरावर वीज पडून एक लाख वीस हजाराचे नुकसान झाले आहे ही घटना शनिवारी सायंकाळ घडली. 

सध्या परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे.  यामुळे विजेच्या गडगटासह पाऊस पडत आहे. याचा फटका चौकेकर कुटुंबीयांना बसला. शनिवारी त्यांच्या घरावर वीज पडून घराचे पत्रे कौले फुटली व इलेक्ट्रिक उपकरणे जळून खाक झाली तसेच घराच्या भिंतीला ही विजेच्या प्रवाहामुळे भगदाड पडले घरामध्ये एकनाथ चौकेकर व त्यांची पत्नी होती. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. गावच्या तलाठी श्रीमती एस ए खरात यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. एक लाख वीस हजाराचे नुकसान झाल्याचे शासनाला कळवले आहे.