
देवगड : वडाचे झाड घरावर पडून देवगड तालुक्यातील शिरगाव- चौकेवाडी येथील धोंडीराम गणपत चौकेकर यांचे अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यांच्या राहत्या घरावर २५ सप्टेंबर रोजी रात्रीच्यावेळी वडाचे झाड पडून लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
शिरगाव- चौकेवाडी रस्त्यालगत धोंडीराम चौकेकर यांचे दुमजली चिरेबंदी घर आहे.या घरात धोंडीराम चौकेकर व पत्नी असे दोघेजण राहतात. २५ सप्टेंबर रोजी रात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या मागील बाजूस असलेले वडाचे झाड मुळासह उन्मळून घरावर पडल्यामुळे स्वयंपाक खोलीतील गृहपयोगी वस्तू अन्नधान्य यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.तसेच स्वयंपाक खोली ,स्नानगृह, सौच्छालय या खोलीसह वरच्या मजल्यावरील घराच्या ४० सिमेंटच्या पत्रांचा चक्काचूर झाला आहे.
दुस-या दिवशी सकाळी येथील ग्रामस्थांना ही घटना समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन घरावर पडलेले वडाचे झाड बाजूला केले.