देवगडात पावसामुळे दीड लाखांचं नुकसान

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 27, 2023 11:39 AM
views 627  views

देवगड : देवगडमध्ये ५५ मि.मी एवढा पाऊसाची नोंद झाली.तसेच वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे देवगड तालुक्यातील वाडा येथील परशुराम गोविंद तावडे यांच्या शेतघराचे ८ सिमेंट पत्रे उडून १५ हजार रुपयाचे नुकसान झाले. तर वाडा येथील वंदना वासुदेव मसुरकर यांच्या राहत्या घराच्या मागील कंपाऊंडची भिंत कोसळून सुमारे १लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.