'अवकाळी'मुळे आंबा पिकाचे नुकसान !

भरपाई देण्यासाठी भाजपाची मागणी
Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 11, 2024 07:17 AM
views 235  views

देवगड : देवगडमध्ये बदलत्या हवामानामुळे अवेळी पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका येथील स्थानिक आंबा बागायतदार शेतकरी यांना मोठ्या प्रमाणावर बसून आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासाठी शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आरीफ बगदादी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देत भाजपाने केली आहे.

देवगडचे तहसीलदार खत्री यांची आज भेट देऊन हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देवगड तालुक्यामध्ये दोन दिवसापूर्वी अवकाळी पाऊस पडून आंबा कलमावरील मोहोर व आंबा फळांचे नुकसान झाले आहे. आंबा उत्पादन समाधान कारक व्हावे या हेतूने खते, किटकनाशके, मेहनत मजूरी, यावर लाखो रुपये खर्च करून अवकाळी पडलेल्या पावसाने शेतकन्यांची निराशा केली आहे. आधीच कर्जबाजारी असलेला आंबा वागायतदार, हाता तोंडाशी आलेले आंबा पिक वाया जात असलेले पाहून हताश झाले आहेत.

तरी सदर घटनेचे गांभर्भीय विचारात घेवून संबंधीत नुकसानी बावत तातडीने पंचनामे करुन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाला सूचित करावे तसेच पिक विमा रक्कमेचा पूर्ण परतावा देखील तात्काळ शेतकन्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी संबंधीत विमा कंपन्यांना सूचना कराव्यात हि विनंती कळावे हे निवेदन देण्यासाठी पडेल चे सरपंच भूषण पोकळे, वैभव वारीक, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दया पाटील, कृषी सेलचे अध्यक्ष भूषण बोडस आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.