देवगडात पावसामुळे झालेल्या पडझडीत तब्बल ६० हजाराचे नुकसान

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 22, 2023 13:33 PM
views 186  views

देवगड : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे कातवण, हिंदळे, विजयदूर्ग, माेंड या गावांना मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुमारे ६० हजाराचे नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यात शुक्रवारी सकाळी १२० मिमी पावसाची नाेंद झाली.

दाेन दिवस वादळी वा-यासह झालेल्या पावसाने कातवणेश्वर येथील संजय तुकाराम आचरेकर यांच्या गाेठयावर झाड पडून सुमारे ३३.५००/- रूपयाचे नुकसान झाले. येथीलच रविंद्र हरीश्चंद्र पेडणेकर यांचे माड वा-याने माेडून पडून नुकसान झाले. विजयदूर्ग येथील मनाली मनाेहर भाबल, सुभाष रावजी भाबल यांच्या घरावर वा-याने नजिकचे शेवग्याचे झाड छप्परावर पडून सिंमेंटचे पत्रे फुटून प्रत्येकी ३ हजार रूपयांचे नुकसान झाले.हिंदळे येथील वळंजू यांच्या घरावर आंब्याचे झाड पडू;न १२ हजार रूपयाचे नुकसान झाले. माेंड येथील आत्माराम येसू पुजारे यांच्या राहत्या घराचे वादळी वा-याने पत्रे तुटून ३८५० रूपयाचे नुकसान झाले.