स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती सोहळा मोठ्या उत्साहात

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 24, 2023 19:01 PM
views 62  views

सावंतवाडी : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक क्रांतिकारकांप्रमाणे लोकमान्य टिळकांनी देखील स्वराज्य प्राप्तीसाठी अनेक प्रयत्न केले. व अशा थोर पुरुषांचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना कळावे याकरिता स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये लोकमान्य टिळकांची जयंती मोठ्या  उत्साहात साजरी केली गेली.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे संचालक रुजुल पाटणकर व शाळेच्या मुख्याध्यापिका दिशा कामत यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी दीपप्रजवलनाने व  लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात केली. शालेय समन्वयक  सुषमा पालव यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळकांविषयी माहिती दिली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रीष्मा सावंत यांनी केले. इयत्ता ४ थी व ३ री मधील विद्यार्थ्यांनी स्वअभिनयाद्वारे व नाट्यस्वरुपात लोकमान्य टिळकांविषयी माहिती सादर केली व टिळकांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. शाळेचे संचालक रुजुल पाटणकर व शाळेच्या मुख्याध्यापिका दिशा कामत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

तसेच कार्यक्रमाच्या शेवटी शालेय सह. शिक्षिका चैताली वेर्लेकर यांनी आभाप्रदर्शन व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशाप्रकारे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये लोकमान्य टिळकांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.