
सावंतवाडी : डी.एड. शिक्षकभरतीबाबत रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार माजी मुख्यमंत्री नारायण राणे व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी लक्ष वेधले आहे. जिल्ह्यात कुठलीही मोठी कंपनी नाही किंवा मोठे उद्योगधंदेही नाहीत. त्यामुळे ४०० व सेवानिवृत्त होणारे शिक्षक असे मिळून सुमारे ६०० च्यावर स्थानिक डी.एड. उमेदवारांना भरतीमध्ये शिक्षकपदी नियुक्ती द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनात मंगेश तळवणेकर म्हणाले, सध्या झालेल्या शिक्षक भरतीत २०५ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली. उर्वरीत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यात सुमारे ४०० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. पुढे सेवानिवृत्त होणारी भरपुर पदे आहेत. २००२ साली नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगरी विभागात असल्याने स्थानिक उमेदवारांना जिल्हा निवड मंडळामार्फत भरती करुन संधी दिलेली होती. तोच डोंगरी विभागाचा निकष लावून भरती प्रक्रिया करुन उर्वरीत ४०० च्या वर रिक्त पदांमधून स्थानिक डी.एड. उमेदवारांना नोकरीत सामावून घ्यावे. हे सर्व शासन स्तरावर होण्यास कुठलीही हरकत नाही. शिक्षणमंत्री हे दीपक केसरकर हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचेच रहिवासी आहेत. खा.राणे यांनी यापुर्वी आपले कौशल्य वापरूश जिल्ह्यातील डी.एड. मुलांना नोकरी दिली होती. त्यामुळे राणे यांच्याशी विचारविनिमय करुन जिल्ह्यातील शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्थानिक डी.एड. उमेदवारांना नोकरीत सामावून घ्यावे.
आमच्या जिल्ह्यात कुठलीही मोठी कंपनी नाही किंवा मोठे उद्योगधंदेही नाहीत. त्यामुळे ४०० व सेवानिवृत्त होणारे शिक्षक असे मिळून सुमारे ६०० च्या वर भरतीमध्ये स्थानिक डी.एड. उमेदवारांना शिक्षकपदी नियुक्ती मिळावी अशी मागणी मंगेश तळवणेकर यांनी केली आहे. तर लोकसभेच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नारायण राणे यांना व पदवीधर मध्ये निरंजन डावखरे यांना एक आशेचा किरण म्हणून राजकारणापलिकडे जावून सामाजिक संस्था, बेरोजगार युवक, युवती यांनी नोकरी धंदा मिळेल या आशेने मतदान केले आहे. त्यामुळे त्यांचा तुमच्या वरचा विश्वास ढळू जावू देऊ नका अशी विनंती श्री. तळवणेकर यांनी केली आहे.