नौसेना दिनाचे वैभववाडीत थेट प्रक्षेपण | आ. नितेश राणेंच आयोजन

Edited by:
Published on: December 04, 2023 18:08 PM
views 318  views

वैभववाडी : मालवण येथे होत असलेल्या नौसेना दिनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वैभववाडीत करण्यात आले होते.आम.नितेश राणे यांच्या माध्यमातूनच येथील छत्रपती संभाजी चौकात स्क्रीन लावण्यात आली होती.तालुक्यातील नागरीकांनी  कार्यक्रमाचा या माध्यमातून आस्वाद घेतला.

भारतीय नौदलामार्फत मालवण तारकर्ली येथे नौसेना दिन साजरा होत आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.हा कार्यक्रम थेट तालुक्यातील नागरिकांना पाहता पाहता यावा म्हणून भाजपाच्या वतीने स्क्रीन लावण्यात आली होती.यावर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.