
कणकवली : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये 'चांद्रयान - 3' मिशनचे थेट प्रक्षेपण इ. 1ली ते इ. 10वीच्या विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन द्वारा दिनांक 14 जुलै 2023 रोजी 'चांद्रयान - 3' चे कसे लॉचिंग झाले याचे थेट प्रसारण शाळेत दाखविण्यात आले.
अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना आणि त्यांचे उपयोजन याची माहिती मिळते.थेट प्रक्षेपण झाल्यानंतर इयत्ता 7वी ते इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःचे मनोगत व्यक्त केले. या उपक्रमासाठी संस्थेच्या सचिव सुलेखा राणे, उत्कृष्टता समन्वयक प्रणाली सावंत, संचालक संदीप सावंत व मुख्याध्यापक गीतांजली कुलकर्णी व सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.