थर्टीफर्स्टच्या तोंडावर साडेतीन लाखांची दारू जप्त

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 30, 2023 16:11 PM
views 120  views

कणकवली : कणकवली पोलिसांनी फोंडाघाटमध्ये थर्टीफर्स्टच्या तोंडावर अनधिकृत दारू साठ्यावर मोठी कारवाई केली आहे. फोंडाघाट येथे तब्बल साडेतीन लाखांची गोवा बनावटीच्या दारूचासाठा कणकवली पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी रामचंद्र दत्ताराम तांबे फोंडाघाट हवेलीनगर याच्यावर अवैध दारूसाठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोंडाघाट येथे माळरानावर लपवून ठेवलेल्या दारू साठ्याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. यात साडेतीन लाखाचा दारूसाठा जप्त केला. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह पोलीस हवालदार उत्तम वंजारे, महिला पोलीस मांजरेकर, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे, श्री आगाव यांच्यासह अन्य पोलीस सहभागी झाले होते.