सातार्डेत पावणे पाच लाखांची दारु जप्त

एकास अटक ; कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 11, 2022 18:31 PM
views 334  views

बांदा : गोव्यातून सिंधुदुर्गात होणार्‍या बेकायदा गोवा बनावटीच्या दारु वाहतूकी विरोधात एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाने मंगळवारी सकाळी सातार्डेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत विविध ब्रँडचे ७० दारुचे बॉक्स जप्त करण्यात आले. कारवाईत ४ लाख ६४ हजार ४०० रुपयांच्या दारुसह ५ लाख २० हजार रुपयांची स्विफ्ट कार असा एकूण ९ लाख ८४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी जनार्दन जयदेव मयेकर (४५, रा. सातार्डा, मुंबार्डेवाडी) याला अटक   करण्यात आली.  गोव्यातून महाराष्ट्रात होणारी बेकायदा दारु वाहतूक रोखण्यासाठी एक्साईजचे कोल्हापूर भरारी पथक कार्यरत झाले आहे. मंगळवारी सकाळी गोव्यातून येणारी स्विफ्ट कार (एम. एच. ०१ वाय. ए. ०५७६) तपासणीसाठी थांबविण्यात आली. तपासणी दरम्यान कारमध्ये ७० दारुचे बॉक्स आढळून आले. याप्रकरणी सातार्डेच्या जनार्दन मयेकर या तरुणाला अटक करण्यात आली. सदर कारवाई कोल्हापूर विभागीय उपायुक्त बी. एच. तडवी यांच्या आदेशान्वये निरीक्षक एस. जे. डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, काँस्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे यांच्या पथकाने केली. अधिक तपास आर. जी. येवलुजे करीत आहेत.