70 लाखांची दारू जप्त..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: November 01, 2023 20:09 PM
views 143  views

कणकवली : राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोल्हापूर विभाग, यांच्या पथकाने ओसरगाव गावच्या हद्दीत ओसरगाव बस थांब्यासमोर संशयित वाहनांची तपासणी करत असताना एक भारत कंपनीची 4828 आर मॉडेलचे 16 चाकी वाहन क्र. NI 01 AG-3820 व या वाहनामध्ये भारतीय बनावटीचे विदेशी मद्याच्या विविध ब्रँड च्या 750 मिलांच्या एकूण 9660 बाटल्या व 180 मिलीच्या 11040 बाटल्या व 500 मिली परिमाणाच्या तीव्र बिअरच्या 2808 बाटल्या सीलबंद प्लॅस्टीक व काचेच्या बाटल्या असे एकूण 1152 बॉक्स सरपणाच्या गोण्याच्या आड लपवून अवैधरित्या वाहतूक करत असताना मिळून आल्याने ते वाहनासह जप्त करण्यात आले.

या कारवाईमध्ये एकूण जप्त मुद्देमालाची किंमत वाहनासह रु. 1,26,32,860/- इतकी असून या गुन्हयामध्ये वाहनचालक लक्ष्मण अर्जुन ढेकळे वय वर्ष 34 रा. बेघर वस्ती, पाडळी (केसी) सुपाने, ता. कराड, जि. सातारा याला अटक करण्यात आली.

ही कारवाई पंकजकुमार निरीक्षक, आर. जी. येवलुजे दुय्यम निरीक्षक, श्री. एस. एस. गोंदकर दुय्यम निरीक्षक व कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, योगेश शेलार, राहुल सपकाळ आदींनी कली. पुढील तपास श्री. आर. जी. मेवलुजे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर हे करीत आहेत. (सदर गुन्हयामधील विदेशी दारूची अंदाजित किंमत 70,80, 360/- असून वाहनाची अं.कि.रू. 55,00,000/- व इतर मुद्देमाल 52,500/- अशी एकूण रू. 1,26,32,860/- असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.