कुडाळ : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल यावर्षी 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत कुडाळ हायस्कूलच्या भव्य मैदानावर होत आहे लायन्स क्लबच्या महोत्सवाचे यावर्षीचे 23 वे वर्ष आहे विविध मनोरंजन कार्यक्रमाबरोबरच दिग्गज कलावंताची उपस्थिती असणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत लायन्स क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर व लायन्स सेवा संकुल अध्यक्ष ऍड अमोल सामंत यांनी दिली
नवीन वर्ष स्वागत पार्श्वभूमीवर दरवर्षी कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयोजन डिसेंबर महिन्यात केले जाते यावर्षी लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गच्या वतीने हा ऑटो इंडस्ट्रीयल कम फूड फेस्टिवल 28 ते 31 डिसेंबर सलग चार दिवस सायंकाळी सहा ते रात्रौ पर्यत होणार आहे आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली यावेळी लायन्स क्लब चे ज्येष्ठ पदाधिकारी ऍड अजित भणगे आनंद बांदिवडेकर सीए सागर तेली शोभा माने गणेश म्हाडदळकर ऍड मिहीर भणगे ऍड शेखर वैद्य डॉ अमोघ चुबे जीवन बांदेकर मंजुनाथ फडके राजवीर पाटील आदी उपस्थित होते यावेळी बोलताना लायन्स सेवा संकुल अध्यक्ष ऍड अमोलसामंत म्हणाले 1998 मध्ये गोवा धर्तीवर फूड फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते आज आमच्या लायन्स क्लब ऑफ सिंधुदुर्गच्या फेस्टिवलचे 23 वे वर्ष असून यावर्षी ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे लायन्स क्लब हा नेहमी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतानाच नवीन वर्ष स्वागत जुन्या वर्षाला निरोप पार्श्वभूमीवर हा महोत्सव सलग चार दिवस विविध करमणूकीच्या कार्यक्रमाने होणार आहे महोत्सवात सिंधुदुर्गसह पुणे सांगली सातारा कोल्हापूर मुंबई या भागातून विविध गाड्या, इंडस्ट्रियल, विविध खाद्य संस्कृतीचे सुमारे नव्वद स्टॉल सहभागी होतील 50 ते 60 हजार लोक या महोत्सवाला भेट देतील सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून एकाच व्यासपीठावर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले दरम्यान या फूड फेस्टिवल मध्ये सर्व प्रकारच्या गाड्या व या गाड्यांसाठी फायनान्स करण्यासाठी बँका कार्यरत असतील 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत खाद्य संस्कृतीसह मनोरंजन होण्यासाठी विविध अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 31 डिसेंबरला या फेस्टिवलला नामांकित दिग्गज असे कलाकार येणार असल्याचे सांगितले लायन्स क्लब अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर यांनी 23 वा हा फूड फेस्टिवल होत असून या फेस्टिवल मध्ये शेतकऱ्यांसाठी सुद्धा स्टॉल असणार आहेत सीए सागर तेली यांनी लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक आरोग्य उपक्रम राबवले जातात पर्यावरण विषयक उपक्रम या संस्थेने राबवलेले आहेत अशा सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थेने गेली 23 वर्षे फूड फेस्टिवलच्या माध्यमातून रसिकांचे विविध माध्यमातून मनोरंजन केले आहे त्यांना आनंद देता हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा आपला महोत्सव यावर्षी प्रथमच सलग चार दिवस होत असल्याचे स्पष्ट केले यासाठी गेली 22 वर्षे फेस्टिवल यशस्वीसाठी जिल्हावासियांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले