
सिंधुदुर्गनगरी :कुडाळ तालुक्यातील श्री लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली या प्रशाळेचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तसेच मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या या प्रशाळेची विद्यार्थिनी सौ. श्वेता पावस्कर /गोवेकर यांचा सत्कार समारंभ १ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार आहे.
कुडाळ तालुक्यातील तुळसुली या ठिकाणी असलेल्या लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई भांडुप येथील शिवाई विद्यालय नाहूर पूर्व या ठिकाणी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळात होणार आहे. या मेळाव्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आलेली या शाळेची माजी विद्यार्थिनी सौ श्वेता राजेश पावस्कर मूळ गोवेकर यांचा सत्कार ही केला जाणार आहे. तरी या माजी विद्यार्थी स्नेह मिळाव्यात मोठ्या संख्येने माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन या मळ्याच्या आयोजक माजी विद्यार्थ्यांनी केले आहे.










