
देवगड : शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार देवदत्त कदम यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कदम यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषदचे माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव थेट ग्राउंडवर उतरले असून, त्यांनी या मतदार संघातील वळीवंडे सह विविध गावांमध्ये प्रचार फेरीत सहभागी होत मतदारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना अंकुश जाधव म्हणाले की, केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवर एकाच विचाराचं भाजप महायुतीचं सरकार कार्यरत आहे. जिल्ह्याचं नेतृत्व सुद्धा महायुतीकडे असून माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीतूनच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शक्य आहे. महाराष्ट्रात महायुतीचे हात अधिक बळकट करण्यासाठी आणि विकासाची गती कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी महायुतीला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. देवदत्त कदम हे सक्षम, तगडे व विकासाभिमुख उमेदवार असून महायुतीने योग्य उमेदवार दिला आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.










