मुणगे आडबंदरमध्ये उबाठाला धक्का; अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 30, 2026 22:02 PM
views 58  views

देवगड : मुणगे आडबंदर येथे उबाठाला मोठा धक्का बसला असून, अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी रामचंद्र मालाडकर, हेमंत जोशी, लक्ष्मीकांत आडकर, संतोष बादेकर, कमलाकर सारंग, तुषार आडकर, प्रदीप नेसवणकर, उमेश तळवळकर, शंकर आडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, तालुका सचिव योगेश चांदोसकर, गोविंद सावंत, भाई पारकर, सदाशिव ओगले आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या पक्षप्रवेशामुळे मुणगे आडबंदर परिसरात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढली असून, स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.