उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी आता लिफ्टची सोय !

माजी मंत्री दीपक केसरकरांच्या हस्ते लोकार्पण
Edited by: विनायक गांवस
Published on: April 02, 2026 16:03 PM
views 616  views

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसलेंची उपस्थिती

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीत लावण्यात आलेल्या नव्या लिफ्टचे लोकार्पण माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले उपस्थित होत्या. 

या सुविधेचा फायदा रुग्ण आणि वृद्ध नागरिकांना करून देण्यात येणार आहे. याचे लोकार्पण आज माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सूर्याजी, नगरसेविका निलम नाईक, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, गौरी गोसावी, प्राची राणे, सुप्रिया नाईक, अमृता मुंगी, हेमांगी रणदिवे, रश्मी नाईक, दीक्षा चव्हाण, मानसी बागेवाडी, प्राजक्ता रेडकर, निलम पडवळ, प्रशांत सातार्डेकर, अनघा चव्हाण आदींसह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.