वालावलकर रुग्णालयात ६५० ग्राम च्या नवजात बालकाला जीवनदान

Edited by:
Published on: April 11, 2025 19:54 PM
views 91  views

चिपळूण : बाळंतपण म्हणजे स्त्री चा पुनर्जन्मच आहे .जर सगळं सुरळीत झालं तर बर, नाहीतर तिला आणि तिच्या बाळाला अनेक यातनानुन पार व्हावे लागते .अगदी असेच दीप्तीच्या बाबतीत झाले.

दीप्तीची ही बाळंतपणाची पहिलीच खेप असल्याने बाळाच्या चाहुलीने ती अगदी आनंदी होती. पण एक दिवस अचानक तिचे डोके दुखू लागले आणि तिला जोरात फिट आली आणि ती बेशुद्ध झाली. घरातील सर्व चिंतीत झाले.जवळच्या डॉक्टर्स नी  दीप्ती आणि बाळाची तब्बेत गंभीर असल्याचे सांगितले. मग कामथे ग्रामीण रुग्णालयातून तिला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. खर्चाच्या दृष्टीने सुद्धा तेच रुग्णालय त्यांना परवडणारे होते.  शिवाय तिथे तज्ज्ञ डॉक्टर्स, रक्ताची सोय, भूलतज्ज्ञ , अत्युच दर्जाचा नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग सुद्धा उपलब्ध असल्याने सुलभ होणार होते.

म्हणून मग लगेचच रुग्णवाहिका डेरवणच्या रस्त्याला लागली पोचेपर्यंत दिप्तीचा श्वास कोंदट आला होता . डॉक्टर्स नी प्रसंगाचे गांभीर्य जाणून लगेचच दिप्तीला शस्त्रक्रियेसाठी ऑपेरेशन थिएटर मध्ये घेतले. भूलतज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञांनी आपले  कौशल्य पणाला लावून दीप्तीची सुटका केली खरी, पण बाळ फक्त २८ आठवडे वयाचे असल्याने वजन फक्त ६५० ग्रम इतकेच होते. त्यामुळे आईचा जीव कदाचित वाचवू पण बाळाची शाश्वती देता येणार नाही असे डॉक्टर्स नि सांगितले. कारण बाळाने जन्मानंतर श्वास घेतला नाही शेवटी बाळाच्या छातीवर दाब देऊन हृदय  सुरु करणायचा प्रयत्न केला गेला. म्हणतात ना देव तरी त्याला कोण मारी आणि हळू हळू बाळाचे ठोके नियमित झाले. पण तरीही प्रयत्न म्हणून बाळाला एन.आय.सी यु. मध्ये दाखल केले गेले. आणि ह्या ६५० ग्रम बाळाचा खरंतर खडतर प्रवास सुरु झाला. पण अत्युच्य दर्जाचा  अती  दक्षता विभागात  डॉक्टर अनिल कुरणे,  सह डॉक्टर अंकीता सुर्वे ,डॉक्टर सयोनी, पंक्ती आणि वृषाली सह  सर्व  परिचारिकांनी क्षणोक्षणी बाळाची काळजी घेतली. बाळाची  गुंतागुंत सोडवण्यासाठी रक्तदाब वाढवणारी औषधे, रक्तातील प्लाटेल्स फ्रेश प्लास्मा  यांचा योग्य वापर, गरजे प्रमाणे इंमुनोग्लुबुलिन्स, प्रतिजैविके, प्राणवायू अश्या प्रकारचे उपचार करण्यात आले आणि विशेष म्हणजे हे  उपचार महात्मा फुले जन  आरोग्य योजनेतुन    झाल्यामुळे नातेवाइकांवरचा आर्थिक ताण कमी झाला आणि शेवटी तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर बाळाचे वजन हळू हळू वाढू लागले. आता बाळ १. ४ किलोचे झाले. स्तनपान करू लागले आणि दीप्तीच्या आनंदाला पारावार उरला नाही.  

वालावलकर नवजात विभाग हा खरंतर कोकणातल्या नवजात बालकांसाठी वरदान ठरत आहे कारण  १ किलोपेक्षा कमी  वजनाची अत्यवस्थ असलेली अनेक बालके इथे मिळणाऱ्या सुविधा, तत्पर उपचार, तज्ज्ञ  डॉक्टरचे मार्गदर्शन, रक्तपेढी अश्या सर्व सुविधांमुळे धैर्याने जगण्याची  झुंज देतात आणि सुखरूप घरी जाता आहेत .  ह्या सगळ्या उपचारासाठीचे आर्थिक बळ हे महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि त्याच बरोबर गरज पडल्यास वालावलकर रुग्णायाल देखील आर्थिक मदतीचा हात कायमच पुढे करत असते आणि भावी पिढी निरोगी राहावी यासाठी सतत प्रयत्नशील आहे.