चलो कणकवली संत शिरोमणी रविदास महाराज भव्य जयंतीउत्सव

चर्मकार समाज बांधवानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे उत्सव समितीच्या वतीने आवाहन
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 02, 2023 17:55 PM
views 195  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा समस्त चर्मकार समाजाच्या वतीने कणकवली येथे भ संत शिरोमणी रविदास महाराज यांचा भव्य जयंतीउत्सव 5 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई गोवा हायवे बस स्टॅन्ड नजीक साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या चर्मकार समाजाने या भव्य जयंती सोहळ्यात उस्फूर्त सहभागी होत आपली एकजूट दाखवून द्यावी असे आवाहन उत्सव समिती च्या वतीने करण्यात आले आहे. हीच ती वेळ आहे समाज एकजुटीची त्यामुळे समाज बांधवांनी या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित लावणे बंधनकारक आहे असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने निमंत्रक विजय मुकुंद चव्हाण, सुजित प्रकाश जाधव ,संजय सुभाष कदम ,पंढरीत महादेव चव्हाण यांनी सर्व समाज बांधवांना केले आहे.

संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंती निमित्ताने कणकवलीमध्ये सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा बौद्धविहार ते बाजारपेठ मार्गे कार्यक्रमास्थळी येऊन पोचणार आहे .त्यामुळे या शोभा यात्रेमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील समाज बांधवांनी सहभागी होणे आवश्यक आहे.

ही शोभायात्रा कार्यक्रमास्थळी पोहोचल्यानंतर सकाळी 11 ते 1 वाजता दीपप्रजन व प्रतिमा पूजन , संत रविदास महाराजांचे आरती, स्वागत गीत ,मान्यवरांचे स्वागत ,मनोगत व्यक्त केले जाणार आहेत. प्रा. डॉ सोमनाथ कदम यांचे व्याख्यान देखील जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहे.

त्यानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत ठेवण्यात आला असून महिलांसाठी खास आकर्षण कार्यक्रम खेळ पैठणीचा या कार्यक्रमाची सुद्धा मेजवानी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी वेळ न दवडता या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती महत्त्वाची आहे. चंद्रसेन पाताडे, राजेंद्र चव्हाण, अँड विराज भोसले, प्रकाश वाघेरकर ,डॉ प्रदीप बाबार्डेकर, भारत पेंढुरकर ,प्रसाद मसुरकर ,नामदेव जाधव ,विठ्ठल चव्हाण ,अंकुश चव्हाण ,महेंद्र चव्हाण ,अनिल जाधव,सी आर चव्हाण ,आनंद जाधव ,मानसी चव्हाण, मयुरी चव्हाण, या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक म्हणून उपस्थित असणार आहेत.