
देवगड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तसेच भांडुप विधानसभेचे उमेदवार शिरिष गुणवंत सावंत व मनसे पक्षातर्फे विधानसभेचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होवो,तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होवोत. यासाठी देवगड तालुका अध्यक्ष संतोष मयेकर यांच्या कडून श्री देव कुणकेश्वर या ठिकाणी अभिषेक करण्यात आला. तसेच सिंधुदुर्ग तालुक्यातील मुंबई स्थित चाकरमानी यांनी ज्या ठिकाणी मनसेचे उमेदवार उभे आहेत तेथे आपले मत देऊन त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
सोबत मनसेचे पदाधिकारी कातवण विभाग अध्यक्ष नंदकुमार हडकर, मनविसे उप तालुकाध्यक्ष पंकज कातवणकर, कातवण मा शाखा अध्यक्ष गणेश खोत,महाराष्ट्र सैनिक प्रथमेश परब व इतर पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.