कुपवडेत रात्री बिबट्याचे दर्शन

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: January 27, 2026 17:23 PM
views 46  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कुपवडे येथील परिसरात शनिवार २४ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावालगतच्या रस्त्यावर अचानक बिबट्या दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, तसेच परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. वनविभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.