
सावंतवाडी : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत मेघना संतोष सावंत प्रथम साटम महाराज वाचन मंदिर ,दाणोली व निरामय विकास केंद्र ,कोलगाव यांच्या संयुक्त विद्यामाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम मेघना संतोष सावंत जि प शाळा धवडकी नं २ द्वितीय स्वरा मनीष नाईक जि. प. शाळा केसरी .तृतीय सुरभी मधुकर राऊळ जि .प .शाळा धवडकी तृतीय विभागून जानवी मनोज सावंत जि .प शाळा दाणोली उत्तेनार्थ तन्वी चंद्रजी सावंत जि .प .शाळा दाणोली उत्तेजनार्थ अन्वी देसाई जि. प .शाळा शिरशिंगे या स्पर्धेत एकूण नऊ शाळा सहभागी झाल्या होत्या. २० स्पर्धक सहभागी झाले होते .कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली.वाचनालयाचे अध्यक्ष भरत गावडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वच स्तरावर कार्यक्रम होणे गरजेचे आहे. याकरिता विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य वाढावे म्हणून या कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .असे मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव डॉक्टर एल .डी .सावंत मुख्याध्यापक प्रकाश गावडे ,परीक्षक माननीय नरेंद्र सावंत कुमारी गौरवी घाटे, सदस्या रश्मी सावंत, संगीता सोनटक्के, गिरीधर चव्हाण ,आदी मान्यवर उपस्थित होते यावे माजी केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत यांचा साटम महाराज वाचन मंदिराच्या वतीने शाल ,श्रीफळ, संविधान ,प्रत देऊन गौरव करण्यात आला यावेळी त्यांनी आपले मत मनोगत व्यक्त करताना मराठी आपली मातृभाषा आहे .तिचा सर्वत्र गौरव झाला पाहिजे तिच्याबद्दल आपल्या मनात अभिमान पाहिजे जेथे जेथे आपल्याला मराठीचे कार्यक्रम घेता येतील त्या ठिकाणी आपण कार्यक्रम घेऊया आणि मराठी भाषेचा कौरव करूया असे मत व्यक्त केले .या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर एल डी .सावंत, गौरवी घाटे ,यांनी मनोगते व्यक्त केलीत जे शिक्षक उपस्थित होते त्यांचा प्रमाणपत्र व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला यशस्वी स्पर्धकांना प्रमाणपत्र रोख रक्कम भेटवस्तू व पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले वाचन संस्कृती वाढावे याकरिता सर्वांनीच प्रयत्न करावे असे मत डॉक्टर एल .डी .सावंत यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सौ दीपा सुखी त्याने खूप मेहनत घेतली व उपस्थितांचे आभार मानले.










