
सावंतवाडी : सोनुर्ली निगुडे या मुख्य रस्त्यावरील जिर्ण झालेल्या पुलाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विरोधात प्रजासत्ताक दिनी उपसरपंच भरत गावकर यांनी उपोषण छेडले. या पुलाचे काम प्रमुख जिल्हामार्ग यादीमध्ये प्राधान्याने घेऊन मंजूरीसाठी पाठविण्यात येईल असे लेखी पत्र उपअभियंता अजित पाटील यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान येत्या पावसाळ्याआधी हे काम मार्गी न लागल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरुन आत्मदहनासारखा मार्ग हाती घेऊ असा इशाराही उपस्थित ग्रामस्थ व राजकीय पदाधिकार्याकडून देण्यात आला.
सोनुर्ली निगुडे या मुख्य रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळील मोरी पूल पूर्णतः जीर्ण झाले असून यावर्षीच्या पावसात वाहून जाण्याची दाट शक्यता आहे गतवर्षी या पुलाची संरक्षण भिंत कोसळली होती त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम बांधकाम विभागाने केले होते परंतु सदर पुल नव्याने उभारण्याची वारंवार विनंती करू सुद्धा याकडे सार्वजनिक बांधकाम दुर्लक्ष करत आहे सदरचे फुल कोसळून रस्ता बंद झाल्यास सोनुर्ली गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे कारण गावातील शेतकऱ्यांची शेत जमीन पुलाच्या पलीकडे असल्याने शेत जमिनीत जाण्या येण्यासाठी हा रस्ता एकमेव मार्ग आहे त्यामुळे हे पुल नव्याने बांधा अशी मागणी उपसरपंच श्री गावकर हे गेल्या दोन वर्षापासून करत आले आहे परिणामी बांधकाम विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने आज अखेर प्रजासत्ताक दिनी बांधकाम विभागाच्या विरोधात ग्रामस्थांना सोबत घेऊन त्यांनी उपोषण छेडले. या उपोषणाला मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पाठिंबा देत सहभाग दर्शविला.
दरम्यान उपोषण स्थळी बांधकाम विभागाचे सावंतवाडी उप अभियंता श्री अजित पाटील यांनी भेट देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र लेखी आणि ठोस उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका उपोषण कर्ते श्री गावकर यांनी घेतली. या उपोषण स्थळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत सचिन बिर्जे अजय सावंत अमित परब जितेंद्र गावकर दिनेश सावंत निगडे ग्रामस्थ व मानकरी शांताराम गावडे आदींनीही भेट देऊन पाठिंबा दर्शवला.
दरम्यान उपअभियंता श्री पाटील यांनी येत्या मार्चमध्ये मंजुरीसाठी पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावात प्रमुख जिल्हा मार्ग यादीत प्राधान्याने या पुलाच्या कामाचे नाव घेण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. या लेखी आश्वासनानंतर श्री गावकर यांनी आपले उपोषण मागे घेतले.
या उपोषणाला दशरथ गावकर, अनंत परब, संजना राऊळ, माजी सरपंच, प्रणाली गाड, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष ओटवणेकर, प्रवीण गाड, सुमिता गावकर, संदिप जाधव, विष्णू नाईक, नारायण नाईक सत्यवान नाईक आनंद देऊळकर, सिमरन जाधव, गणपत मांजरेकर, धीरज पवार, ओंकार कुडतरकर, अरुण गाड,आनंद धडाम, रामदास सावंत,अनिल गाड, चंद्रकांत गावकर, शिवराम गावडे, रणजित राऊळ,मनोज वारंडेकर, गंगाराम राऊळ,बबली मुळीक, शंकर नाईक,आना गावकर,दत्ताराम वरंडेकर, दादू बाबी गावकर, अरुण गावकर, जगन्नाथ गावकर,शंकर वारंडेकर,सरस्वती धुरी, विलास कुडतरकर, प्रथमेश गोसावी, विठ्ठल मांजरेकर,संदिप गाड, ब्राम्हणांद मोर्ये, सोनाली गोटस्ककर, भारती गावकर वैभवी गावकर, सुभाष परब आधी ग्रामस्थांनी सहभाग दर्शवत पाठिंबा दिला.










