
सावंतवाडी : सालईवाडा भागात रस्त्यावर मिळालेली मोठी रक्कम सावंतवाडी दोघा युवकांनी पोलिसांकडे सुपूर्द केली. संदेश कुणकेरकर आणि साईनाथ राणे असे त्यांचे नाव असून ही रक्कम संदेश ग्राफिक्स या सालईवाड्यातील दुकानाच्या समोर त्यांना पडलेली मिळाली. ही रक्कम त्यांनी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडेही रक्कम सुपूर्द केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे उपस्थित होते. दरम्यान, संबंधित रक्कम नेमकी कोणाची याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच ज्याची कोणाची रक्कम आहे त्यांनी ती रक्कम किती आहे हे ओळखून पोलिसांकडून परत मिळवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी केली. तसेच ही रक्कम पोलिसांकडे सुपूर्द केल्याबद्दल त्या दोन्ही तरुणांचे पोलिसांनी अभिनंदन केले










