मिठमुंबरीत कायदेविषयक मार्गदर्शन !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 30, 2024 13:07 PM
views 97  views

देवगड : तालुका विधी सेवा समिती देवगड व तालुका वकिल संघटना देवगड यांच्या संयुक्त  विद्यमाने ग्रामपंचायत मिठमुंबरीच्या वतीने जि.प. प्राथमिक शाळा मिठमुंबरी येथे कायदेविषयक मार्गदर्शन मिठमुंबरी सरपंच श्री . बाळकृष्ण गांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

याप्रसंगी मार्गदर्शन शिबिरात विधिज्ञा श्रीम .एस.एस. कालेकर यांनी बालकांचे संरक्षण व कायदा , अर्धवट शाळा सोडलेल्या मुलांना पुन्हा शाळेत समाविष्ट करून घेण्याबाबत त्या तरतुदीची माहिती तसेच कौंटुबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५ बाबत मार्गदर्शन केले . तसेच विधिज्ञा एम.एम. खोबरेकर यांनी बेटी बचाओ , बेटी पढाओ याबाबत मार्गदर्शन केले तर पाणी व स्वच्छता समन्वयक विनायक धुरी याने शासकीय योजनेंबाबत मार्गदर्शन केले .

 या कायदेविषयक शिबीराबाबत सरपंच श्री .बाळकृष्ण गांवकर यांनी कौंतुक करत अशा प्रकारचे मार्गदर्शन शिबीर मिठमुंबरी गावात केल्याबद्दल तालुका विधी सेवा समिती देवगड , तालुका वकिल संघटना देवगड यांचे आभार मानले .

या मार्गदर्शन शिबीराला प्रमुख मान्यवर ग्रामसेविका श्रीम .आर .एस. गोवळकर मॅडम , श्री .एस.आर . जाधव , मुख्याध्यापक श्री . मधुसुदन घोडेसर, शाळा समिती अध्यक्ष श्री .हेमंत तोंडणकर , शिक्षक श्री .सचिन धुरी , शिक्षक श्री . सुरेश साळुंखे , माजी तंटामुक्त अध्यक्ष श्री .सत्यवान गांवकर , ग्रा.प सदस्य श्रीम .मिनल मुंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी शाळेचे विदयार्थी , ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका व बचतगटातील महिला, मोठया संख्येने उपस्थित होते .

 या मार्गदर्शन शिबीराचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक मधुसुदन घोडे सर , तर आभार सरपंच बाळकृष्ण गांवकर यांनी मानले .