
सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिरच्यावतीने कै सौ विजयश्री मठकर उर्फ मठकरबाई जयंती दिनी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कै. सौ. विजयश्री जयानंद मठकर उर्फ मठकरबाई यांच्या कुटुंबियांनी संस्थेकडे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेच्या व्याजातून प्रतिवर्षी महिला अगर मुलांच्या समस्यांबाबत मठकरबाईंच्या जयंतीदिनी कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावर्षी बुधवार ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वा. डॉ. भारती पाटील, कोल्हापूर यांचे प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीम. डॉ. विजयालक्ष्मी चिंडक पाटील, सावंतवाडी या भूषविणार आहेत.
भारतात खरंच स्त्रिया सुरक्षित आहेत का ? या विषयावर व्याख्यान होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.