महिलांच्या दैनंदिन जीवनातील विज्ञान विषयावर आज सावंतवाडीत व्याख्यान

Edited by:
Published on: October 11, 2024 06:34 AM
views 133  views

श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी आयोजित स्व. विजयश्री मठकर स्मृतिप्रित्यर्थ महिला विचार-जाणिवा विकास प्रबोधनपर व्याख्यान आज दि. ११ ऑक्टोबरला सायं. 6:00 वाजता होणार आहे. व्याख्यान विषय : महिलांच्या दैनंदिन जीवनातील विज्ञान, वक्ता : डाॅ. नंदा हरम, पुणे स्थळ : श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी इथं हे व्याख्यान होणार आहे.

व्याख्यानविषयासंबंधी - रुढी-परंपरा व सामाजिक जोखडांच्या बंधनांमध्ये अडकलेल्या भारतीय स्त्रियांना रोजचं जगणं जगत असताना असंख्य प्रश्न मनाशी पडत असतात. माझ्यावरच का हे परंपरांचे ओझे? मीच का ही सगळी व्रतवैकल्ये करायची? अमुक तमुक गोष्ट मनाला पटत नसतानाही का करायची? या फलाण्या परंपरेला आजच्या काळात काही अर्थ उरलाय का? 

असे असंख्य प्रश्न आणि विज्ञानाच्या कसोटीवर यातलं काय टिकतंय, काय टिकत नाहीये, आंधळेपणाने परंपरा अनुसरण्याऐवजी डोळसपणे याला सामोरं कसं जाता येईल, याविषयीच बोलणार आहेत डाॅ. नंदा हरम.

वक्त्यांविषयी - डाॅ. नंदा हरम या अनेक वर्षे टाटा मुलभूत संशोधन केंद्रामध्ये संशोधक अधिकारी व काही वर्षे इंजिनिअरींग काॅलेजात प्राध्यापक म्हणून सेवा करून निवृत्त. दूरदर्शन, आकाशवाणी, विविध नियतकालिके, शाळा-महाविद्यालये यांमधून सातत्याने विज्ञानविषयक कार्यक्रम, लेखन, सादरीकरण. स्त्रीजागृतीविषयक संस्था व चळवळींतून सक्रिय.