ही गर्दी पैसे देऊन बोलवलेली नाही !

सावंतवाडी राष्ट्रवादीला सोडा, अन्यथा परिणाम दिसतील : अमित सामंत
Edited by: विनायक गावस
Published on: October 27, 2023 12:21 PM
views 217  views

दोडामार्ग : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत दोडामार्ग तालुक्यात पार पडत आहे.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अमित सामंत  म्हणाले, ही गर्दी पैसे देऊन बोलवलेली नाही‌. झब्ब्याच्या खिशात पैसे मोजून आणलेली ही लोकं नाहीत‌. शरद पवार यांच्यावर असलेलं हे प्रेम आहे‌. तुमच्या रूपानं साक्षात शरद पवारच आल्यासारखे आहे‌. कितीही वाईट दिवस आले तरी आम्ही तुमची साथ सोडणार नाही. अनेक निवडणूका आम्ही लढतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला असं इथं म्हंटले जात. परंतु, निवडणूकांत मित्रपक्षांना आमची गरज का लागते ? याच उत्तर देखील दिलं पाहिजे. महाविकास आघाडीला आमचा विरोध नाही. परंतु, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं मत जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केले‌. अर्चना घारेंना उमेदवारी दिली तर निश्चितच त्या निवडून येतील. जर सावंतवाडी आम्हाला तिकीट मिळालं नाही. तर दोन मतदारसंघात त्याचा परिणाम दिसेल हे शिवसेना, कॉंग्रेसनही ध्यानात ठेवावं. तुमच्या पेक्षा वरिष्ठ कुणी नाहीत. हा पक्ष महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीसाठी मागून घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.


याप्रसंगी खा. सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ नेते सुरेश दळवी, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, व्हिक्टर डॉंन्टस, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, निरीक्षक शेखर माने, नम्रता कुबल, महीला अध्यक्ष रेवती राणे, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, संदीप गवस, सावली पाटकर,प्रदीप चांदेलकर, महादेव देसाई, ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद महाले, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, गौतम महाले, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, सागर नाईक, सुभाष लोंढे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.