एलसीबी कॉन्स्टेबल आशिष गंगावणे - जयेश सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी

Edited by: दिपेश परब
Published on: January 25, 2024 06:04 AM
views 302  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले भटवाडी येथे अचानक कार पलटी होऊन त्यात अडकलेल्या चार सांगली येथील नागरिकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या हेड कॉन्स्टेबल आशिष गंगवणे व जयेश सरमळकर यांनी प्रसंगाधान दाखवत गाडीतील नागरिकांना बाहेर काढून पुढील अधिक उपचारासाठी पाठवले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे. 

    बुधवार २४ जाने रोजी सायंकाळी सांगली येथील अजिंक्य भिडे (४०) यांच्या सहित ४ व्यक्ती यात ६०-६५ वर्षाचे २ वृद्ध होते. ते  देवदर्शन करुन सांगली करिता जात असताना वेंगुर्ला भटवाडी येथे चालकाला भुरळ आल्याने अचानक भ्रेक मारल्याने गाडी पलटी झाली. यावेळी त्या मार्गाने जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल  आशिष गंगवणे व जयेश सरमळकर यांनी  तात्काळ गाडीत अडकलेल्या २ वृद्ध व चालक १ व महिला याना ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून त्यांची सुटका केली. व त्याना उपचाराकरिता पुढे पाठवण्यात  आले.