
सावंतवाडी : निगुडे येथील आयु.लक्ष्मण गंगाराम निगुडकर हे भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा सावंतवाडीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते यांना कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्या तर्फे आदर्श सरकारी नोकर गौरव पुरस्कार प्राप्त झाला.
सरकारी कार्यालयात राहून आपला कारभार स्वच्छपणे करणारे कर्मचारी सध्यपरिस्थितीत खूपच कमी आढळतात. मात्र, लक्ष्मण गंगाराम निगुडकर याला अपवाद आहेत. निगुडे सारख्या ग्रामीण भागातून ते कठीण परिस्थितीत शिक्षण घेत पुढे आलेत. आपल्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर ते उद्या दिनांक ३१ मे २०२२ रोजी निवृत्त होत आहेत.
देवगड तहसील कार्यालयातून त्यांनी आपल्या शासकीय नोकरीची सुरवात केली. त्यांनतर सावंतवाडी, दोदामार्ग, कुडाळ, सावंतवाडी, कुडाळ आणि आत्ता सावंतवाडी तहसील कार्यालयात ते शासकीय सेवा बजावत आहेत. त्यांनी शासकीय सेवा नेहमीच प्रामाणिकपणे बजावली. कोणाकडूनही कसली अपेक्षा न ठेवता कसल्याही अमिषाला बळी न पडता त्यांनी काम करत राहिला. सर्वसामन्यांची कामे अगदी जलद कशी होतील याकडे तुमचा नेहमीच कटाक्ष असायचा. सामाजिक केलं. अनेक गरजू व्यक्तीना त्यांनी सढळ हस्ते मदत केली. त्यांच्यासारख्या प्रामाणिक सरकारी अधिकाऱ्यांची समाजाला आज गरज असल्याच्या भावना आज अनेकजण व्यक्त करत आहेत. यासाठी आयु.लक्ष्मण निगुडकर यांना भारतीय बौध्द महासभा शाखा सावंतवाडी व मित्रपरीवार यांचेकडून खुप खुप अभिनंदन व पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.