लक्ष्मण कदम यांचा सन्मान

Edited by: विनायक गांवस
Published on: October 07, 2025 16:46 PM
views 115  views

सावंतवाडी : गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे आणि भारत गौरव पुरस्कार प्राप्त लक्ष्मण सकाराम कदम यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन रसाई कला क्रीडा मंडळ जिमखाना मैदान सावंतवाडी येथील लाखे बांधवाकडून त्यांच्या सन्मानार्थ त्यांना शाल श्रीफळ व पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 


हॉस्पिटल व इतर सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांच खूप मोठ  योगदान आहे. प्रसंगात कुठल्याही क्षणी कोणाच्याही मदतीला धावून जाणं हे त्यांच वैशिष्ट्य आहे. समाजामध्ये वावरत असताना आपलं काम व कुटुंब सांभाळून इतरांच्या ही प्रसंगात आपलं तन-मन-धन देऊन समाज कार्य केले जातं अशावेळी त्या व्यक्तीचा योग्य वेळी सन्मान केला जातो त्यांच्या अशा अनेक सामाजिक कार्याची दखल घेऊन आज त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे.