पर्यटननगरीत आज 'लावण्यखणी' !

Edited by: भगवान शेलटे
Published on: December 29, 2023 15:02 PM
views 129  views

सावंतवाडी : शहरवासीयांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांनी भरगच्च असलेला सुंदरवाडी मिनी महोत्सव सध्या सुरु आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी व दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे . विविध पदार्थांचे फूडस्टॉल व घरगुती वस्तूंचे स्टॉल इथे आहेत. आज २९ डिसेंबरला प्रणाली कासले निर्मित ''लावण्यखणी” हा कार्यक्रम होणार आहे. 30 डिसेंबर रोजी इनरव्हील क्लब यांचा इनरव्हील ब्युटीक्वीन स्पर्धा होणार आहे. तर शेवटच्या दिवशी 31 डिसेंबरला अक्षता सावंत यांचा रोलर्स म्युझिक नाईट ऑर्केस्ट्रा होणार आहे. तरी सावंतवाडी शहरातील रसिक प्रेक्षकांनी या रंगबहार कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलं आहे.