
कुडाळ : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्षभर दर महिन्याच्या 22 तारखेला प्रबोधन करणारी कीर्तने, व्याख्याने, प्रवचन कुडाळ आणि मालवण तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली आहेत.विद्यार्थी, शेतकरी, महिला यांच्यासाठी मार्गदर्शन करणारी तसेच तरुणांना रोजगार विषयक मार्गदर्शन करणारी अभ्यासक, तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने या प्रबोधनमालेत होतील.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवेंद्र प्रबोधमाला माजी खासदार तथा कुडाळ-मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साजरी होत आहे. यानिमित्ताने मंगळवार २२ ऑगस्ट २०२३ ला सायंकाळी ६:३० वा.भाजपा कार्यालय, कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाच्या भव्य मंडपात 'देव, देश आणि धर्मासाठी प्राण घेतल हाती'* या उक्तीने भारावलेल्या देवेंद्र प्रबोधमालेतील धर्मारक्षणार्थं पाहिले पुष्प 'कृष्णार्जून युद्ध' या कथानकाच्या रूपाने कीर्तनकार ह.भ.प.प्रशांत धोंड व सहकारी सादर करणार आहेत.तरी आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित रहाण्याचे आव्हान तालुकाध्यक्ष दादा साईल आणि संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.