उंबर्डेत BSNL च्या ऑप्टिकल फायबर टेलिफोन - इंटरनेट सेवेचा शुभारंभ

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 24, 2023 16:01 PM
views 245  views

वैभववाडी : उंबर्डे येथे बीएसएनएलच्या ऑप्टिकल फायबर टेलिफोन आणि इंटरनेट सेवेचा शुभारंभ झाला आहे.यामुळे या गावासहीतह लगतच्या गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार आहे. येथील गौस पाटणकर यांच्या  ग्लोबल स्काय ब्रॉडबँड नेटवर्क्स या फर्मच्या माध्यमातून ही सेवा ग्राहकांना मिळणार आहे. 

उंबर्डे गावासहीत पंचक्रोशीत इंटरनेट सेवेची समस्या होती.या भागात नेट नसल्याने सरकारी कार्यालयासह खाजगी वापरकर्त्यांना कामात अनेक अडचणी येत असत.ही बाब लक्षात घेऊन येथील श्री पाटणकर यांनी बीएसएनएलशी कायदेशीर करार करून ही सेवा उंबर्डे आणि जवळील गावांसाठी उपलब्ध करून दिली आहे.आता सरकारी कार्यालयासह खाजगी वापरासाठी इंटरनेट जोडणी या भागात दिली जाणार आहे. ही सेवा उंबर्डे येथे सुरू करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बीएसएनएलचे प्रबंधक रविकिरण जुन्नू यासह सर्व अधिकारी आणि उंबर्डे गावचे माजी सरपंच शेरपुद्दीन बोबडे, निवृत्त पोलीस अधिकारी संदीप सरवणकर, लियाकत बोबडे आदींचे सहकार्य लाभले.